अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर शहरातील तलाठी कॉलनीत अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांनी वारंवार सांगूनही नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला आहे. शहरात भुयारी गटारीचे काम सुरु आहे. भुयारी गटारीच्या कामामुळे दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला.
तलाठी कॉलनीत बऱ्याच दिवसांपासून अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा होतो. नळाला दूषित पाणी पुरवठा होत आहे. पूर्णता फेसयुक्त पाणी येत आहे. बाहेरून आणलेले शुद्ध पाणी घरात चार दिवस कसे पुरवावे असा प्रश्न नागीरकांनी नगरपालिका प्रशासनाला केला आहे.
पाण्यात फेस येत दुर्गंधी येत आहे. नगरपालिकेत संबंधीत अधिकारी यांना याबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने यामुळे कुणालाही आरोग्याचा धोका निर्माण झाल्यास पालिका प्रशासन जबाबदार राहील. याबाबत दखल न घेतल्यास नागरिक पालिकेवर मोर्चा काढतील असाही इशारा नागरिकांनी दिला आहे..