अनिल पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर विधानसभा मतदारसंघासाठी महायुती तर्फे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या उमेदवारिवर शिक्कामोर्तब होऊन राष्ट्रवादी पक्षातर्फे काल दुपारी अधिकृत नाव जाहीर झाल्याने अमळनेरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष भागवत पाटील, शहर अध्यक्ष मुक्तार खाटीक, भाजपा माजी शहराध्यक्ष उमेश वाल्हे, भाजपा शहर अध्यक्ष विजय राजपूत, भूषण पाटील अलिम मुजावर ,विजू पाटील, विकांत पाटील,सुनिल पवार गुणवंत पाटील, डॉ. रामराम पाटील यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान अनिल पाटील हे आज दि २४ ऑक्टोबर रोजी महायुती तर्फे मंगळग्रह मंदिरापासून सकाळी १० वाजता जोरडाए शक्तीप्रदर्शन करून नामांकन दाखल करणार आहेत.अमळनेर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अनिल पाटीलच असतील आणि येथील जागा महायुतीच्या वतीने अनिल पाटलांसाठी राष्ट्रवादी लाच सोडली जाईल हे जवळपास आधीपासूनच निश्चित होते.मात्र काल त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्याने त्यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.

Protected Content