जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कंटेनरने पीक अपला दिलेल्या धडकीत तीन जण ठार झाल्याची घटना जामनेर शहराच्या जवळ घडली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जामनेर शहराजवळ असलेल्या शेतकरी सहकारी जीनिंग मिलच्या वळणावर काल सायंकाळी साडपाच वाजेच्या सुमारास कंटेनर आणि पीकअपचा भीषण अपघात झाला. यात भुसावळ येथून छत्रपती संभाजीनगर येथे जाणार्या डाक विभागाच्या कंटेनरने समोरून येणार्या पीक अपला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह बाहेर काढले. या संदर्भात जामनेर पोलीस स्थानकात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर, रात्रीपर्यंत यातील मयतांची ओळख देखील पटू शकली नव्हती.