यावल प्रतिनिधी । यावल पंचायत समितीची नविन प्रशासकीय इमारतीचे काम प्रगतीपथावर असुन हे काम आता अंतीम टप्यात आले आहे.
दरम्यान पावसाळ्या पुर्वीच पंचायत समितीचे स्थलांतर या नव्या इमारतीत होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यावल पंचायत समितीचे अत्यंत जुने व जिर्ण झालेले कार्यालय हे या पावसाळ्यात कोसळण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत असुन पन्नास वर्षा पेक्षा ही अधिक काळापासुन जुन्या असलेल्या पंचायत समितीच्या इमारतीची पतझड गेल्या पाच ते सहा वर्षापासुन सुरू झाली होती. तेव्हा पासुन आमदार शिरीष चौधरी आणी माजी आमदार स्व. हरीभाऊ जावळे यांच्या अथक प्रयत्नातुन अखेर या पंचायत समितीसाठी नुतन प्रशासकीय इमारती करीता दोन कोटी १४ लाख रुपयांचे निधीस मान्यता मिळुन या इमारतीच्या कामास प्रयत्यक्षात दिड वर्षापासुन सुरूवात करण्यात आली होती.
संबधीत ठेकेदाराने अत्यंत वेगाने केले असुन चांगल्या प्रतिचे बांधकाम संबधीत ठेकेदार यांच्या कडुन स्थानिक प्रशासनाने करून घेतल्याचे ही दिसुन येत आहे. येणाऱ्या एक ते दिड महिन्यात ही भव्य नविन प्रशासकीय इमारत पुर्णत्वास येणार असल्याची माहीती देवुन सदरची इमारत ही प्रशासनाच्या ताब्यात दिली जाणार असल्याची माहीती भुसावळ येथील बांधकामाचे ठेकेदार प्रमोद नेमाडे यांनी दिली. असा ही योगायोग यावल पंचायत समितीची सुमारे पन्नास वर्षा पुर्वीची इमारत ही त्या वेळेस मंत्री असलेले लोकसेवक स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या प्रयत्नातुन इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. आता त्याच पंचायत समितीच्या नविन भव्य प्रशासकीय इमारतीसाठी आमदार शिरीष चौधरी यांच्या पाठपुराव्याने पन्नास वर्ष जुन्या बांधकामास मान्यता मिळालेल्या नुतन इमारतीचे बांधकाम त्यांच्या कार्यकाळात होत असल्याने हे महत्वाचे आहे, असे बोलले जात आहे.