रविवारी ‘येथे’ सुरू राहणार लसीकरण : जाणून घ्या अचूक माहिती

जळगाव प्रतिनिधी। जिल्ह्यात लसींची उपलब्धता असल्यामुळे रविवारी जळगाव शहरासह जिल्ह्यातील २१ केंद्रांवर लसीकरण होणार आहे.

सध्या जळगाव शहरासह जिल्ह्यात कोविशिल्ड व कोविशिल्डचे ९३२० तर कोव्हॅक्सीनचे ११० डोस उपलब्ध आहेत. जळगावात विश्‍वप्रभा हॉस्पीटल येथे खासगी तत्वावर कोव्हॅक्सीनचे १८१० डोसेस उपलब्ध आहेत. यामुळे रविवारी जिल्ह्यात ३० मे रविवारी २१ केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. यात ४५ वर्षांवरील लाभार्थींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल.

जिल्ह्यात रेडक्रॉस सोसायटी जळगाव; उपजिल्हा रूग्णालय चोपडा; ग्रामीण रूग्णालय पारोळा; ग्रामीण रूग्णालय रावेर; ग्रामीण रूग्णालय बोदवड; ग्रामीण रूग्णालय धरणगाव; ग्रामीण रूग्णाल एरंडोल, छत्रपती शाहू महाराज रूग्णालय जळगाव, ग्रामीण रूग्णालय पाल ता. रावेर; ग्रामीण रूग्णालय पिंपळगाव ता. पाचोरा; ग्रामीण रूग्णालय न्हावी, ता. यावल; ग्रामीण रूग्णालय मेहुणबारे, ता. चाळीसगाव; पोलीस मुख्यालय, जळगाव; मोबाईल टिम, जळगाव; एनयूएएम पाचोरा, एनयूएचएम चोपडा; स्वाध्याय भवन जळगाव; प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर, ता. चोपडा; प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी ता. जामनेर; प्राथमिक आरोग्य केंद्र, लोहारा ता. पाचोरा; प्राथमिक आरोग्य केंद्र लोहटार, ता. पाचोरा या शासकीय केंद्रांवर लसीकरण होईल. तर विश्‍वप्रभा हॉस्पीटल जळगाव येथे खासगी लसीकरण उपलब्ध राहणार आहे.

शहरात रविवारी रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, डी. बी. जैन रुग्णालय, शाहीर अमर शेख हॉस्पिटल, नानीबाई अग्रवाल हॉस्पिटल, मुलतानी हॉस्पिटल, मनपा शाळा क्रमांक ४८ पिंप्राळा याठिकाणी लसीकरण सुरु राहणार अाहे.

Protected Content