Home न्याय-निवाडा बोदवड न्यायालयात संविधान दिवस उत्साहात साजरा

बोदवड न्यायालयात संविधान दिवस उत्साहात साजरा


बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे, सर्व श्रेष्ठ असे संविधान आहे. परंतु अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ व अनेक रूढी-परंपरा या सर्वांना न्याय देणारे व सर्व समाज घटकांना विकासाच्या प्रवाहात आणणारे संविधान आहे. त्यात वेळ, काळानुरूप दुरुस्ती करण्याची तरतूद आहे. त्यामुळे संविधान हे नेहमी नव्या युगाचे नायक आहे. व आज देशातील सर्व कायद्याचे व भविष्यात होणाऱ्या सर्व कायद्याचे संविधान हे उगमस्थान असल्याचे प्रतिपादन तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अर्जुन पाटील यांनी केले. संविधान दिनानिमित्त बोदवड येथील न्यायालयात आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत

भारतीय राज्यघटनेत अनेक महत्वपूर्ण तत्त्वे आहेत, ज्यांच्या आधारे देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मूलभूत, राजकीय तत्त्वे, कार्यपद्धती, अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, कायदे इत्यादी ठरवण्यात आले आहेत.

आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही हा भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. असे महत्वपुर्ण  विचार ॲड.अर्जुन पाटील याप्रसंगी मांडले.

या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व घटना निर्मिती’ या विषयावर अॅड. धनराज प्रजापती यांनी विचार मांडले. तर ॲड.पी.आर.मोझे, अॅड. के.एस. इंगळे, ॲड. संतोष कलंत्री, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष बोदवड न्यायालयाचे न्यायाधिश क्यु.यु.एन शरवरी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.यावेळी  संविधानाचे पूजन व उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी सदर कार्यक्रमास अँड.सुनिल जाधव, अॅड.सी. के. पाटील, ॲड.मुकेश पाटील, ॲड.वैभव पाटील, तसेच सर्व न्यायालयीन कर्मचारी, अधीक्षक वैभव तरटे, कार्यक्रम समन्वयक शैलेश पडसे, वकील पक्षकार बहुसंख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound