नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेतील अंतर्गत वादातून ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षाबाबत उद्या घटनापीठाची स्थापना करण्यात येणार आहे.
सरन्यायाधीश यू यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उद्या खंडपीठाची स्थापना केली जाईल असे आज जाहीर केले आहे. शिवसेनेचे पक्षचिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती दिली होती. या वादावर ५ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले आहे. या प्रकरणावर सुनावणी कधी होणार आहे, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
आता या प्रकरणी दाखल केलेल्या सर्व खटल्यांमध्ये पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ निकाल देणार आहे. अर्थात, याआधी या खटल्यात अनेक सुनावण्यात होतील ही बाब देखील उघड आहे.