चाळीसगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात नारिकांचे कामधंदे, उद्योग बंद असल्याने हैराण झाले आहे. असे असतांना महावितरण भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना वीज बिल अव्वाच्या सव्वा आल्याने ग्राहकांना नाहक त्रास होत असल्याने ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी चाळीसगाव शिवसेनेच्या वतीने महावितरण कंपनीला निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील आणि शहरातील वीज ग्राहकांना वाढीव बिला आल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लोकांना अव्वाच्या सव्वा बिले आले आहेत गेल्या चार महिन्यापासून कोरोनाचे थैमान असताना लाँकडावुन मुळे शहरात व तालुक्यात रिडींग घेतली गेली नाही आता सर्वत्र ऑनलाइन होत असताना सर्व वीज ग्राहकांना सरासरी चे बिल दिले गेले. परंतु चार महिन्याचे एकत्रित स्लॅब न लावता प्रत्येक महिन्याचे सरासरी युनिट 1 ते 100, 100 ते 200 असा स्लँब लावण्यात यावा पहिलेच कोरोणामुळे उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे नागरिक हैराण असतांना या सर्वत्र गोष्टीचा विचार करून प्रत्येक महिन्याचे स्लॅब नुसार बिले देण्यात यावी, इतरत्र दंड मीटर भाडे, इंधना अधिभार लावु नये, कोणत्याही नागरिकाचे वीज बिल थकीत असेल तर त्याला सवलत देण्यात यावी, वीज कनेक्शन बंद करू नये अशी विनंती करत चाळीसगाव शिवसेनेचे पदाधिकारींनी नागरिकांचा समस्येचा पाढा मांडत दिलेल्या बिलाबद्दल, झालेल्या चुकांबद्दल नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करत चाळीसगांव कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. त्याच्या समवेत हर्षवर्धन जगताप उपकार्यकारी अभियंता, जे.टी. महाजन अतिरिक्त कार्यकारी अभियंता हे देखिल होते.