जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात २३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले तर १९३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
तालुका निहाय आकडेवारी
जळगाव शहर-४, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-३, अमळनेर-०, चोपडा-१२, पाचोरा-०, भडगाव -०, धरणगाव -०, यावल -०, एरंडोल -०, जामनेर-१, रावेर -०, पारोळा -०, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर -०, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार ३८० कोरोना रूग्ण आढळून आले. त्यापैकी १ लाख ४७ हजार ९३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९० कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सध्या जिल्ह्यात ८५१ बाधित रूग्ण उपचार घेत आहे.