मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असतांनाच कॉंग्रेसचे जोरदार विरोधाची चुणूक दाखविली असतांनाच आपला पक्ष प्रखर विरोधकाची भूमिका पार पाडणार असल्याचे प्रतिपादन नाना पटोले यांनी केले आहे.
आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून अधिवेशनच्या आधी कॉंग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करून आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे संकेत दिले. यानंतर नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना राज्यात कॉंग्रेसला आगामी काळात चांगले दिवस येणार असून नुकत्याच झालेल्या सर्व्हेतदेखील हेच दिसून आल्याचे सांगितले.
दरम्यान, पटोले यांनी आज विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचं नाव जाहीर केलं जाईल, असं सांगितलं आहे. भाजपकडे अनुभवी नेते नसल्यामुळे भाजपने दुसर्यांचे आमदार चोरले आहेत. भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष आहे हे जनतेला कळलं आहे. आज अधिवेशनात सरकारविरोधी भूमिका घेऊ. अधिवेशनात शेतकरी आणि सामान्यांचे प्रश्न मांडणार आणि सत्ताधार्यांनी महाराष्ट्राला लावलेला कलंक आम्ही पुसू, असं नाना पटोले म्हणाले.