मुंबई प्रतिनिधी । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी काँग्रेसने चालवली असल्याचे नवनियुक्त मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी जाहीर केले आहे.
जगताप यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी काँग्रेसने चालवली आहे. मुंबईतील प्रत्येक वॉर्डातील काँग्रेस कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायचे आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी सर्व २२७ वॉर्डांत तयारी करायची आहे.
आगामी पालिका निवडणुकांच्या निमित्ताने मुंबईतील सर्व २२७ वॉर्डमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून त्यांना प्रेरणा देण्याचे काम आम्हाला करायचे आहे. मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, हा भावनिक, गुंतागुंतीचा विषय आहे. आरक्षण देण्याचे काम महाविकास आघाडीने केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुरोगामी महाराष्ट्रात या मुद्द्यावरून तेढ निर्माण करू नये.