मणिपूरमध्ये काँग्रेसला सुरुंग; पाच आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश

 

नवी दिल्ली- मणिपूरमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील सरकार अस्थिर करण्याची काँग्रेसची खेळी भाजपाने काँग्रेसवरच उलटवली असून, काँग्रेसच्या मणिपूरमधील पाच आमदारांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली.

भाजपाच्या काही आमदारांनी दिलेले राजीनामे आणि मित्रपक्षाच्या आमदारांची नाराजी यामुळे मणिपूरमधील एन. बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर झाले होते. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या बहुमत चाचणीवेळी काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाने बजावलेला व्हिप धुडकावून लावत विधानसभेच्या एकदिवसीय अधिवेशनाला दांडी मारली होती. त्यामुळे बिरेन सिंह सरकारला बहुमत मिळवणे सोपे गेले होते. दरम्यान, या सहा आमदारांनी काँग्रेससोबत विधानसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

Protected Content