मुंबई वृत्तसंस्था । कॉग्रेस पक्षाने आज दुसरी 52 उमेदवारांची यादी जाहीर केले आहे. त्यात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने कराड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सोबत पत्रकार युवराज मोहिते यांची गोरेगावमधून तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरलेले असताना काँग्रेसने आज रात्री उशिरा ३२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत आजी-माजी आमदार आणि नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. कराडमधून पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर लातूर ग्रामीणमधून विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. कैलास गोरंट्याल यांना जालन्यातून तर अजंता यादव यांना कांदिवली पूर्वेतून उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातून कसबा पेठेतून काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, तर शिवाजीनगर मतदारसंघातून माजी नगरसेवक दत्तात्रय बहिरट यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.