
मुक्ताईनगर –लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आयोजित आढावा बैठक उत्साहात पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या बैठकीत उमेदवार निवड, निवडणूक नियोजन आणि संघटनात्मक बांधणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व जळगाव जिल्हा काँग्रेस निरीक्षक आरिज बेग मिर्झा यांनी भूषविले. तसेच मुक्ताईनगर विधानसभा निरीक्षक तुळशीराम नाईक आणि प्रदेश काँग्रेस सरचिटणीस धनंजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात आलेल्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार स्थानिक स्तरावर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या व निवडणूक लढविण्याबाबतच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली.
या प्रसंगी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृषिरत्न दिनेश पाटील, बोदवड तालुका काँग्रेस अध्यक्ष भारत भाऊ पाटील, व्ही.जी.एन.टी. सेलचे प्रवक्ते अॅड. अरविंद गोसावी, जिल्हा सरचिटणीस संजय भाऊ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भोईसर, तसेच अनेक जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद महाजन, पुंडलिक धायले, बि.डी. गवई, नानाभाऊ नेरकर, डॉ. विष्णू रोटे, बाळूभाऊ पाटील येवती, प्रा. सुभाष पाटील, सलीम मंत्री, गुलाबराव महाराज, राजेंद्र जाधव, ज्ञानेश्वर इंगळे, अमोल पाटील, सुनील सुरवाडे, अनंतराव देशमुख, संजय चौधरी, गणेश पाखरे, आरिफ रब्बानी, भास्कर वानखेडे, सुभाष सूर्यवंशी, आलम शाह, मधुकर कोसोदे, संजय धामोडे, पुंजाजी पाटील, विजय देवराम पाटील, यासीन खान आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली.
तसेच सेवादल महिला तालुका प्रमुख सौ. सुमनबाई चौधरी, महिला शहराध्यक्ष सौ. ज्योतीताई धामोळे, आणि अर्जुन मराठे यांच्यासह महिला व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. या बैठकीत स्थानिक पातळीवरील पक्षबांधणी मजबूत करण्यावर, तसेच सर्वसमावेशक उमेदवार निवड प्रक्रियेवर भर देण्यात आला.



