नवी दिल्ली वृत्तसंस्था । आज प्रदेश काँग्रेस समितीची दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत दिल्लीत बैठक होत असून यात नवीन प्रदेशाध्यक्षपदाचे नाव निश्चीत होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू आहे. या अनुषंगाने विधानसभाध्यक्ष नाना पटोले, मंत्री विजय वडेट्टीवार, माजी खासदार राजीव सातव, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री यशोमती ठाकूर आदींची नावे यासाठी चर्चेत आहेत. तर वडेट्टीवार व पटोल यांनी तर जाहीररित्या आपण प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमिवर, आज दिल्लीत काँग्रेसची महत्वाची बैठक होत आहे. यात राज्यातील काँग्रेसचे सर्व मंत्री व दिल्लीतील वरिष्ठ नेते सहभागी होणार असून यात प्रदेशाध्यक्षपदासाठी नावावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीसाठी सर्व नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.