Home Cities धरणगाव जळगावात काँग्रेसची राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या नियोजनासाठी बैठक

जळगावात काँग्रेसची राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या नियोजनासाठी बैठक


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे 12 मार्च रोजी खानदेशात आगमन होत आहे. १२ तारखेस दोंडाईचा येथे रात्री यात्रेचा मुक्काम असून शिंदखेडा, सोनगीर, धुळे मार्गे न्याय यात्रा मालेगाव मार्गे सौंदाने नासिक मार्गे मुंबईकडे जाणार आहे. सदर न्याय यात्रेत जळगाव जिल्हा काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. या यात्रेचे नियोजन करण्यासाठी जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने 9 मार्च दुपारी दोन वाजता सर्व प्रदेश, जिल्हा, तालुका, सेल, फ्रंटचे पदाधिकारी व काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे.

सदर सभेत जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी, उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, बंटी भैय्या, सचिव कोलपकर, अॅड. संदीप भैय्या पाटील, गट नेता प्रभाकर सोनवणे, सर्वसेलचे प्रदेश जिल्हा तालुका पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, जमील भाई शेख. अनंत परिहार. धरणगाव काँग्रेस चे शहराध्यक्ष यांनी केले आहे.


Protected Content

Play sound