Home राजकीय सावद्यातील काँग्रेसच्या मेळाव्यात परिवर्तनाची साद ( व्हिडीओ )

सावद्यातील काँग्रेसच्या मेळाव्यात परिवर्तनाची साद ( व्हिडीओ )

0
43

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथे आज झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या मेळाव्यात डॉ. उल्हास पाटील यांना विजयी करण्यासाठी परिवर्तनाची साद घालण्यात आली.

येथील जोहरा हॉलमध्ये आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाइं (कवाडे गट) महाआघाडीचा मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील, महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, अरूण पाटील, निळकंठ फालक, डॉ. अर्जुन भंगाळे, राजेश वानखेडे, सोपान पाटील, देवेंद्र मराठे, मुनव्वर खान, हितेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी आपल्या मनोगतातून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीकास्त्र सोडून देशहितासाठी महाआघाडीला साथ देण्याचे व रावेरातून डॉ. उल्हास पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

पहा : काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीच्या मेळाव्याचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound