मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्य सरकारात महाविकास आघाडी असून मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला राष्ट्रवादीने पाठींबा दिला असला तरी कॉंग्रेसने मात्र सावध पावित्रा घेतला आहे. त्यामुळे मुंबई मनपात निवडणुकीपूर्वी महाविकास पॅटर्न अशक्य असल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे जाहीर होण्याच्या सुरुवातीपासूनच भाजपा मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापित करण्यासाठी जोमदारपणाने पूर्णपणे तयारीत आहे. तर महापालिकेत विरोधीपक्ष नेते यांनी अनेक प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत बॉम्बगोळा टाकला आहे. तसेच भाजपा सुरुवातीपासूनच पोलखोल यात्रा करत सत्ताधारी पक्षावर सतत हल्ला चढवत भ्रष्टाचाराचे मुद्दे घेऊन मैदानात आलेला आहे. तर कॉंग्रेस देखील विविध भ्रष्टाचाराचे मुद्दे घेत विरोधी भूमिका जाहीर करीत सावध पावित्रा घेतलेला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी पॅटर्न अशक्य असल्याचे चित्र आहे.