कोल्हापूर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली असून यात प्राथमिक फेर्यांमध्ये कॉंग्रेसच्या उमेदवाराला आघाडी मिळाली आहे.
प्रचारकाळात खूप माजलेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरू झाली. कॉंग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर झालेल्या या जागेवर ही निवडणूक झाली. या निवडणुकीत कॉंग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपने सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली होती. कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात प्रामुख्याने ही लढत झाली. अत्यंत चुरशीने याचा प्रचार झाला असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.
सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरुवात झाली असून २६ फेर्यात मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या पाच फेर्या पूर्ण झाल्या असून यात कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना २२६८१ इतकी मते मिळाली असून भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना १५१५९३३ इतकी मते मिळाली आहेत. यामुळे जाधव यांना आघाडी मिळाली आहे.