Home आरोग्य बीडीएस पूर्ण केल्याबद्दल डॉ.निकीता महाजनचा सत्कार

बीडीएस पूर्ण केल्याबद्दल डॉ.निकीता महाजनचा सत्कार

0
22

जळगाव प्रतिनिधी । हिंगोली येथील डॉ. हेडगेवार डेंटल कॉलेजमधून बॅचलर इन डेंटल सर्जरीचे शिक्षण पूर्ण करुन नुकतीच पदवी संपादन केल्याबद्दल शनिवार, ११ रोजी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते डॉ.निकीताचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर असलेले विजय वानखेडे ह्यांची कन्या डॉ.निकीता हिने नुकतीच चांगल्या गुणांनी बीडीएस पदवी संपादन केली. सप्टेंबर २०२१ मध्ये परिक्षा झाली असून नुकताच निकाल लागला, यात निकीताने यश प्राप्त केले आहे. त्यानिमित्‍त गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील आदिंनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

 


Protected Content

Play sound