जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील गोद्री परिसरात अवैधरित्या लाकूड भरून नेणाऱ्या ट्रकवर वन विभागाने कारवाई केली असून लाकडासह ट्रक जप्त करण्यात आला आहे.
आज गुरुवार, दिनांक 19 रोजी दुपारच्या सुमारास गोद्री परिसरात वनविभागाचे वनपाल प्यारेलाल महाजन व कर्मचारी गस्त घालत असताना एक ट्रक (क्रमांक एम एच 06 – 0367) गोदरी गोद्रीकडून जामनेरकडे संशयितरित्या जातांना आढळून आला.
यावेळी वन कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता या ट्रकमध्ये इमारती लाकूड आढळून आले. याबाबत ट्रक वाहकाला परवाना विचारणा केली असता सदर इमारती लाकूड हा विना परवाना वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर लाकडासह ट्रक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतला असून या ट्रॅकवर वन गुन्हा दाखल केला आहे.
विना परवाना लाकूड वाहतूक करणाऱ्या लाकूड वापरावर वन विभागाने अशाप्रकारे कारवाई केल्यामुळे वृक्षतोड करणाऱ्या व्यापाऱ्यांवर वचक बसणार आहे.