Home Cities अमळनेर शेतात लागलेल्या आगीत ठिंबक नळ्या जळून खाक; २० हजारांचे नुकसान

शेतात लागलेल्या आगीत ठिंबक नळ्या जळून खाक; २० हजारांचे नुकसान


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील गांधली शिवारातील शेत गट क्रमांक ९८ मधील शेतात लागलेल्या आगीत शेतातील ठिंबक नळ्या जळाल्याने अंदाजे २० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील पिळोदा गावात रमेश सोनू धोबी वय ६० हे वृध्द आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता ते गांधली शिवारातील शेत गट क्रमांक ९८ मधील त्यांच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या शेतात गहू पिकाच्या खुट्यांना आग लागली होती. त्यामुळे त्यांच्या शेतातील ठिंबक नळ्या देखील जळून खाक झाले. यात अंदाजे २० हजार रूपयांचे नुकसान केल्याचे समोर आले. ही आग कश्यामुळे लागली हे समजू शकले नाही. शनिवारी २७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीसात धाव घेवून खबर दिली. त्यानुसार अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound