यावल प्रतिनिधी | ‘केंद्रातील भाजप सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात’ यावल येथे सुरू करण्यात आलेल्या जगजागरण अभियानाचा आज समारोप करण्यात आला.
जनजागरण अभियान कॉंग्रेस कमेटीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व प्रदेश उपाध्यक्ष, आमदार शिरीष चौधरी, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या संकल्पनेतून ‘केंद्रातील भाजप सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात’ जगजागरण अभियान राबविण्यात आले.
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती दिन दि.१४ नोव्हेंबरपासून यावल शहर व तालुक्यात काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद जळगांवचे गटनेता प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील सुरु करण्यात आलेल्या या अभियानाची सांगता आज दि.२९ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
याप्रसंगी इंटक जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदिर खान, यावल सहकारी शेतकी संघ संचालक अमोल भिरूड, जेष्ठ नगरसेवक गुलामरसुल हाजी गु.दस्तगीर, युवक जिल्हाउपाध्यक्ष ईमरान पहेलवान, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, मागसवर्गीय शहराध्यक्ष विक्की गजरे, विजय जावरे, अस्लम सर, सतिश बडगुजर, नाना तायडे, अयुब खान, लुकमान तडवी, सागर बडगुजर आदी कार्यकर्ते उपस्थित होते..