जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पोलीस दल, रोटरी क्लब जळगाव इलाईट आणि पोलीस स्पोर्टस अकॅडमीतर्फे नवरात्रीनिमित्त आयोजीत स्वयंसिध्दा शिबिराचा आज शुक्रवारी १५ ऑक्टोबर सकाळी समारोप करण्यात आला.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वयंसिध्दा स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन ७ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले होते. यात महिलांना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी कराटे, स्केटींग याबाबत प्रशिक्षक अश्विनी निकम, राजेंद्र जंजाळे आणि जागृती महाजन यांनी परिश्रम घेवून ७५ विद्यार्थींनीना प्रशिक्षण दिले आहे. हे प्रशिक्षण महिलांसाठी विनामुल्य होते. त्या शिबीराचे समारोप आज शुक्रवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० जिल्हा मुख्यालयात मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात हेमलता बेंडाळे, रेखा मांडगे, दिपाली देशमुख, जयश्री चौधरी, ऐश्वर्या झोपे, दुर्गाश्री महाजन, दिपमाला भावसार, सपना काळे, सृष्टी पाणी यांना मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित, वेल्फेअर शाखेचे निरिक्षक अंबादास मोरे, रोटरी क्लब इलाईटचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप आसोदेकर, मुख्य प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे, पोलीस दलाच्या अश्वीनी निकम, जागृती काळे, प्राजक्ता सोनवणे, पोलीस मुख्यालयातील अमित माळी आदी मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती आहे. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राजक्ता सोनवणे, सुर्यकांत अहिरे, तुषार ढाके, स्विटी गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.