केळी उत्पादक शेतकऱ्यांची मिटली चिंता; आ. चंद्रकांत पाटलांच्या पाठपुरावा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सन २०२१-२२ व २०२३-२४ अंतर्गत राज्य हिश्श्याची रु. ३४४,६१,८७,६३६/- रक्कम विमा कंपनीस वितरित पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार सन २०२१-२०२२ व २०२३-२०२४ मध्ये राज्य हिश्श्याची रु.३४४,६१,८७,६३६/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत,महाराष्ट्र शासन,कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,शासन निर्णय क्रमांक फवियो-२०२४/प्र.क्र.१६८/१०-ओ, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय विस्तार, मुंबई-४०००३२ तारीखः २४ सप्टेंबर, २०२४ अन्वये परिपत्रक प्रसिद्ध झाले असून मुक्ताईनगर मतदार संघातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना सन २०२१-२०२२ व २०२३-२०२४ मध्ये नुकसानी पोटी पिक विमा मिळणार आहे. यासाठी आमदार चंद्रकांत पाटील व इतर लोकप्रतिनिधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश आले असून केळी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाईची प्रत्यक्ष रक्कम मिळणार आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२१-२२ व २०२३-२४ अंतर्गत कृषि आयुक्तालयाने केलेली शिफारस विचारात घेता, राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी आंबिया बहार सन २०२१-२२ साठी रु.२,७९,३९१/- व सन २०२३-२०२४ साठी रु. ३४४,५९,०८,२४५/- असा एकूण रु. ३४४,६१,८७,६३६/- इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी आयुक्त (कृषि) यांना उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरची रक्कम आंबिया बहार हंगाम २०२१-२२ व २०२३-२४ करीता वितरीत करण्यात येत असून त्याचा वापर इतर हंगामाकरीता अनुज्ञेय असणार नाही असे शासन निर्णयात नमूद आहे.

Protected Content