भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील शिवदत्त नगरातील आयुष्यमान आरोग्य मंदीर या दवाखान्यातून १५ हजार रूपये किंमतीचे कॉम्प्यूटर चोरून नेल्याची घटना रविवारी ११ मे रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी १४ मे रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील शिवदत्त नगरात भुसावळ नगरपालिकेचे आयुष्यमान आरोग्य मंदीर या दवाखान्याचे लाकडी दरवाजाचे कूलूप तोडून आत प्रवेश करत १५ हजार रूपये किंमतचे कॉम्प्यूटर चोरून नेले. ही घटना ११ मे रोजी सकाळी ९ वाजता समोर आले. याप्रकरणी डॉ. तौसिफ खान फिरोज खान यांनी बुधवारी १४ मे रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ महेश चौधरी हे करीत आहे.