Home प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय चुंचाळे गावात अस्वच्छतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

चुंचाळे गावात अस्वच्छतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे गावात असलेली अस्वच्छतेबाबत लोकशाही दिनी तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीची दखल घेत दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 

मुबारक नवाब तडवी रा. चुंचाळे ता. यावल यांनी दिलेल्या तक्रारी तक्रारीत म्हटले आहे की,  यावल तालुक्यातील चुंचाळे येथील सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांच्या संगनमताने गावात व गावाच्या बाहेर अस्वच्छता पसरली आहे. अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी देवूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात आणि बसस्थानकाच्या आवारात उकीरडा करण्यात आले आहे. गावातील ग्रामस्थ इथेच घाण व कचरा टाकत आहे. यामुळे गावात दुर्गंधी पसरली असून आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील पुरूष हे उघड्यावर शौचालयाला जात आहे. याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार मुबारक तडवी यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound