यावल प्रतिनिधी | हिंगोणा ग्रामपंचायतमध्ये ‘दलित वस्ती सुधार योजने’च्या निविदा गोंधळाविषयी जिल्हा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यानुसार सरपंच व ग्रामसेवकास यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.
तालुक्यातील हिंगोणा ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्ती निधीचा गैरवापर आणि ऑनलाईन टेंडरमध्ये हस्तक्षेप करून आर्थिक व्यवहाराने टेंडर प्रक्रीयेत काळाबाजार करणारे ग्रामसेवक व ग्रामपंचायत सरपंच आणी ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरूद्ध कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट ) जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी गटविकास अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात दिलेल्या लिखित तक्रार निवेदनात राजू सुर्यवंशी यांनी म्हटले आहे की , हिंगोणा तालुका यावल या ग्रामपंचायतमध्ये दलीत वस्ती सुधार या योजने अंतर्गत होणाऱ्या कामांची निविदा ही ऑनलाईन काढण्यात आली होते , परन्तु ग्रामसेवक व ग्राम पंचायतचे सरपंच आणि सदस्य आर्थिक मोहातून टक्केवारीची रक्कम मागत असल्याने सदरची निविदा रद्द केलेली आहे.
या निविदा प्रक्रीयेत संबधीत ठेकेदारास कोणतीही नोटीस न देता किंवा जिल्हा परिषद पातळीवर वरिष्ठांकडून मार्गदर्शन न मागवता सर्व ग्राम पंचायतच्या सदस्यानी सदरची निविदा रद्द केली असल्याचे राजू सुर्यवंशी यांनी म्हटले असून, शासनाच्या वतीने मिळणाऱ्या गावाच्या विकास निधीची ग्रामपंचायतच्या कारभारीच्या टक्केवारीच्या मोहापोटी मिळणाऱ्या निधीची उधळपट्टी करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे .
सदरचे निवेदनावरुन गटविकास अधिकारी नेहा भोसले यांनी तात्काळ कारवाई करीत हिंगोणा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि सरपंच यांना आज शुक्रवार, दि.२१ जानेवारी २०२२ रोजीयांना कारणे दाखवा नोटीस बजावली असुन , सरपंच व ग्रामसेवक हे गैरहजर राहील्यास त्यांच्या विरूद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा ( शिस्त व अपील ) अधिनियम१९६४तरदुतीनुसार तसेच महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम१९५८चे कलम ३९ (१ ) नुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येवुन प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येइल असे ही गटविकास अधिकारी नेहा भोसले यांनी बजावलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे.