किनगाव सरपंचास शिवीगाळ करणाऱ्याविरुध्द तक्रार (व्हिडीओ)

yaval

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव खुर्द येथील ग्रामपंचायती सरपंचास शिवीगाळ करणाऱ्याविरुध्द यावल तहसीलदार व पोलीस निरिक्षक यांना आखिल भारतीय सरपंच परिषदचे जिल्हा अध्यक्ष पुरुजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज दि. 7 सप्टेंबर रोजी तक्रार निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, किनगाव खुर्द येथील सरपंच भुषण पाटील यांना एका अज्ञान व्यक्ती गावातील काही लोकांसमोर पैशांची मागणी केली. पंरतू त्याला पैसे देण्यास मनाई केल्यास त्याने सरपंच यांना शिवीगाळ करत धमक्या दिल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजुन ४५ मिनीटांनी घडली आहे. तसेच अज्ञान तरुण स्वताला पत्रकार असल्याचे सांगत होता. सरपंच भुषण पाटील यांनी संबंधीत व्यक्तिने केलेली शिवीगाळ व संभापणाची क्लिप देखील पत्रकारांना दाखवली. या संदर्भात सरपंच परिषदव्दारे या व्यक्तिविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला कडक शासन व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अज्ञान तरुण जळगाव येथे राहत असल्याचे कळते आहे.

आखील भारतीय सरपंच परिषदचे जिल्हा अध्यक्ष पुरूजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या तक्रार अर्जावर परिषदचे यावल तालुकाध्यक्ष देविदास धांगोपाटील, महिला तालुकाध्यक्ष भारती चौधरी, कार्याध्यक्ष नरेंद्र पाटील, सुषमा सपकाळे, सरपंच वनोली, भागवत पाटील, सरपंच कासारखेडा, सावखेडा सिमसरपंच हाजराबाई तडवी, चुंचाळेच्या सरपंच सुंनदा पाटील, कोरपावली सरपंच कविता कोळंबे, अंजाळे सरपंच मनिषा सपकाळे, गिरडगावच्या सरपंच अलकार पाटील यांच्यासह अन्य सरपंचांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

Protected Content