पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यज प्रतिनिधी | आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमिवर आज जातीय सलोखा बैठक उत्साहात पार पडली.
येत्या २८ सप्टेंबर रोजी श्री. गणेश विसर्जन व ईद ए मिलाप हे उत्सव एकाच दिवशी आल्याने परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जातीय सलोखा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुस्लिम बांधवांनी मोठे मन दाखवत २८ सप्टेंबर रोजी येणारा ईद ए मिलाफ चा जुलुस उत्सव २९ सप्टेंबर रोजी काढण्यात येण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, पोलिस निरीक्षक राहुल खताळ, नगरपालिकेचे कर निरिक्षक डी. एस. मराठे, मा. नगरसेवक विकास पाटील, पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, जितेंद्र वल्टे, गोपनीय शाखेचे पो. कॉ. सुनिल पाटील, गजु काळे, पो. कॉ. विनोद बेलदार, भगवान बडगुजर, दिलीप वाघमोडे, दिलीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोंगरे, सईद पंजाबी, शेख रसुल शेख उस्मान, नसीर बागवान, जिशान रजा, बालाजी गणेश मित्र मंडळाचे अभिनंदन संघवी, विशाल सोनवणे, नितीन पाटील, प्रदिप वाघ, अष्टविनायक गणेश मित्र मंडळाचे संदिप सोनवणे, इमाम रजा, मुन्ना पिंजारी, विज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ शिवदास पाटील, रुपेश चव्हाण, अमोल राजपुत उपस्थित होते.
२८ सप्टेंबर रोजी साजरे होणारे श्री. गणेश विसर्जन व ईद ए मिलाप हे उत्सव शांततेत साजरे करावे. मिरवणूकी दरम्यान पारंपारिक वाद्यांचाच उपयोग करावा जेणेकरून कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत. जनतेच्या सहकार्याशिवाय पोलिस प्रशासन काम करु शकत नाही. त्यामुळे जनतेने पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांनी उपस्थित समाज बांधवांना याप्रसंगी केले. यावेळी पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी देखील उपस्थित समाज बांधवांना येणारे उत्सव हे गुण्यागोविंदाने साजरे करावे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या शहराचे नाव खराब होवु नये याबाबत गांभीर्य ठेवावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांना मिरवणुकी व जुलुस दरम्यान उद्भवणार्या समस्या मांडल्या. या बैठकीचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी मानले.