प्रवाशी राजा दिन व कामगार पालक दिना निमित्ताने विभागीय नियंत्रकांचा संवाद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील यावल एस टी बस आगाराच्या वतीने प्रवाशी राजा दिवस व कामगार पालक दिवस साजरा करण्यात आला त्या प्रसंगी एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांच्यासह विभागीय वाहतुक अधिकारी डी जी बंजारा व विभागीय कामगार अधिकारी किरण एस भावसार या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी विभागीय नियंत्रकअधिकारी भगवान एस जगनोर यांनी प्रवाशांनी यावल आगाराला नवीन बसेस मिळाव्यात यासह विद्यार्थ्यांच्या व नागरीकांच्या सोयीसाठी यावल बसस्थानकातुन सुटणार्‍या काही बसेसच्या वेळापत्रकात बदल करण्याबाबत प्रवाशांनी आपल्या सुचना मांडल्यात. तसेच यावल बस स्थानकाच्या इमारतीचे मंजुर झालेले बांधकाम कधी होणार याकडे देखील विभागीय नियंत्रकांचे लक्ष वेधण्यात आले. या वेळी जगनोर यांनी कामगार पालक दिनाचे औचित्य साधुन कामगारांशी संवाद साधुन त्यांच्या कडून त्यांच्या समस्या व अडचणी जाणुन घेतल्या व त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाचे नियोजन यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप भास्कर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. कार्यक्रमास आगारातील चालक,वाहक,एस टी आगारातील कर्मचारी व प्रवाशी मोठया संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आगारातील वाहक किशोर मंदवाडे यांनी केले.

Protected Content