जळगाव, प्रतिनिधी | मतदारांना त्यांचे मतदान कोठे आहे हे माहित होण्यासाठी तसेच त्यांची वोटिंग स्लीप मिळविण्यासाठी युवाशक्ती फाउंडेशनतर्फे मतदार मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे महानगरपालिका आयुक्त उदय टेकाळे यांनी गुरुवारी उद्घाटन केले.
मतदार मदत कक्ष सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काव्यरत्नावली चौक, पांडे डेअरी चौक आणि गणेशवाडी येथील सुपारी कारखाना येथे दि. १७ ते २१ ऑक्टोबर पर्यत खुला राहणार आहे. गुरुवारी काव्यरत्नवली चौकात आयुक्तांनी उदघाटन केले. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडिया, सचिव अमित जगताप उपस्थित होते.यावेळी जेष्ठ नागरिक मंचचे पदाधिकारी दिलीप पाटिल, कडू राणे, विश्वास भट, अरुण सोनार, विजय पुराणिक यांच्यासह फाउंडेशन अध्यक्ष मंजीत जांगिड़, संदीप सूर्यवंशी, पियुष हसवाल, आकाश वाणी, संग्रामसिंह सूर्यवंशी, क्षितिज भालेराव, उमेश भंगाळे, अमित पाटिल, करण जांगिड़, हर्षल पाटिल,अतुल सपकाळे, रोशन पाटिल इ उपस्थित होते. नागरिकांनी मदत कक्षात जाऊन त्यांचे मतदान कोठे आहे त्याची खात्री करून वोटिंग स्लीप घेऊन जावी, मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.