यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा नुकताच गुणगौरव सत्कार करण्यात आला.
या कार्येक्रमाच्या अध्यक्षस्थानी नुतन मराठा विद्याप्रसारक मंडळाचे संचालक व पचायत समितीचे माजी उपसभापती सदस्य उमाकांत रामराव पाटील तर विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमेटी चेअरमन निळकंठ रामदास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगासने केली शाळेचे उपशिक्षक प्रविण भिमराव पवार यांनी योगासनांचे विविध प्रात्यक्षिके सादर केले.
तसेच माध्यमीक शालांत परिक्षेत शाळेचा दहावीचा निकाल ९६% टक्के लागला. यात कु. सयनाज मुबारक तडवी ८५.८०% गुण मिळवून प्रथम कु. रोशनी सलीम तडवी ८५.६०% गुण मिळवून द्वितीय तर कु.नरगीस रफिक तडवी ८५.२०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. उतीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार उमाकांत रामराव पाटील व निळकंठ रामदास पाटील मुख्याध्यापक जे.डी.साळुंके यांनी केला.
या संपूर्ण कार्येक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस.जी.पाटील, एस.बी.सोनवणे, एस.जे.मांडेवाल, एस.एम.लाड, टी.डी.कोळी, पी.बी.पवार, जे.आर.तडवी व ए.आर.तडवी व यु.एस.पाटील यांनी महत्वाचे परीश्रम घेतले.