अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील महिला समूह गटाच्या मॅनेजर श्रीमती अर्चना महाजन यांच्या सौजन्याने कळमसरे ग्रामपंचायतीस सुमारे ३० खुर्च्यांच्या सेट सप्रेम भेट म्हणून देण्यात आला.
यामुळे ग्राम पंचायतमध्ये होणारे लहान मोठे सभांसाठी हा३० खुर्च्यांचा सेट उपयुक्त ठरणार आहेत. याप्रसंगी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच पिंटू राजपूत, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला चौधरी, मीरा बडगुजर, मीना कुंभार, लताबाई भिल, रेश्माबाई चौधरी, गणेश चौधरी, संदीप पाटील, दिनकर चव्हाण, पल्लवी चौधरी, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील तसेच तसेच आयडीएफसी व एसबीआय बँकेच्या अमळनेर शाखेच्या भारती भोई, एकता नेरकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.