स्तुत्य उपक्रम : डॉ.उल्हास पाटील रुग्णालय तर्फे मोफत आरोग्य शिबीर

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या वतीने जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात येत आहेत. दरम्यान, आज यावल तालुक्यातील कासारखेडा, भादली आणि मोहाडी येथे एकाचदिवशी कॅम्पचे आयोजन केले होते.

रुग्णसेवा हिच ईश्‍वरसेवा हे ब्रिद घेऊन गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालय जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील गावोगावी तज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे पोहोचत आहे. खेड्यापाड्यात घेण्यात येत असलेल्या कॅम्पद्वारे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जात असून अनेकांना गंभीर आजाराची लक्षणे दिसत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात येण्याचा सल्ल्यासह येण्यासाठी गाडीचीही व्यवस्था उपलब्ध करुन दिली जात आहे. मंगळवार, २२ मार्च रोजी यावल तालुक्यातील कासारखेडा, भादली आणि मोहाडी येथे एकाचदिवशी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

सुप्रिम कॉलनीतील शिबिराचा ११३ नागरिकांना लाभ 

जळगाव येथील सुप्रिम कॉलनीतील शिवाजी महाराज चौकात सोमवार, २१ मार्च रोजी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी मुधमेह, रक्‍तदाब, टू डी इको तपासणी अगदी मोफत करण्यात आली. याप्रसंगी मेडिसीन तज्ञ डॉ.तेजस कोटेचा, सर्जरीचे डॉ.अनिश जोशी, डॉ.कल्पना देशमुख, इंटर्न हर्षल राणे, सिद‍्धार्थ सिंग, आकाशे रेंगे यांनी आलेल्या रुग्णांच्या समस्या जाणून घेत योग्य ते मार्गदर्शन केले. शिबिरासाठी नर्सिंगचे स्टाफचेही सहकायर्र्र्र् लाभले. या शिबिराचा ११३ नागरिकांनी लाभ घेतला असून ४२ रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात येण्याचा सल्‍ला देण्यात आला आहे. शिबिर यशस्वीतेसाठी मार्केटिंगचे रत्नशेखर जैन, टि.व्ही.पाटील, मकरंद महाजन, विशाल शेजवळ यांचे सहकार्य लाभले.

कासारखेड्यातील शिबिरांचा ग्रामस्थांना लाभ 

यावल तालुक्यातील कासारखेडा येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात मंगळवार, २२ मार्च रोजी भव्य महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. उद्घाटन माजी आमदार दादासाहेब रमेश विठ्ठल चौधरी, यावल-रावेर काँग्रेसचे गटनेते बापूसाहेब शेखर सोपान पाटील, चिंचोलीचे नानासाहेब अनिल साठे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आर.जी.पाटील, शेखर सोपान पाटील, उमाकांत रामराव पाटील, अनिल दंगल पाटील यांची विशेष उपस्थीती होती. शिबिरार्थी रुग्णांची मेडिसीन तज्ञ डॉ.सुशांत वागज, सर्जरीचे डॉ.अनिश जोशी, नेत्रविभागातील डॉ.अनुजा गाडगीळ, इंटर्न हर्षल राणे, प्रमोद सोळुंके, हेमंत, आयुष यांनी तपासणी केली. शिबिर आयोजन आणि यशस्वीतेसाठी कासारखेड्याचे सरपंच भागवत शंकर पाटील (बबलूभाऊ), आडगावचे सरपंच रशिद अकबर तडवी, प्रसाद दादा, बबलू न्हावी, भय्या दादा यांचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वीतेसाठी दिपक पाटील, तुषार सुरे यांचे सहकार्य लाभले.

निशुल्क अस्थिरोग शिबिरामुळे भादलीकरांना दिलासा

भादली येथे मंगळवार, २२ मार्च रोजी सकाळी १० वाजता निशुल्क अस्थिरोग निदान शिबिराला सुरुवात झाली. यात गुडघे दुखणे, पोटर्‍या दुखणे, सांधे दुखणे आदि हाडांसंबंधित विकारांवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ डॉ.परिक्षीत पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच रुग्णांची तपासणीसुद्धा केली. या निशुल्क शिबिरामुळे भादलीकरांना दिलासा मिळाला आहे. शिबिर यशस्वीतेसाठी टि व्ही पाटील, मकरंद महाजन यांनी प्रयत्न केले.

मोहाडीतील महिलांना स्त्रीरोग निदान शिबिराचा लाभ 

मासिक पाळीत वेदना होणे, अंगावरुन अतिप्रमाणात पांढरे पाणी जाणे, पोटदुखी, वंध्यत्व आदि प्रकारच्या स्त्रियांच्या आजाराचे निदान शिबिर मंगळवार, २२ मार्च रोजी मोहाडी येथे घेण्यात आले. सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.माया आर्विकर, रेसिडेंट डॉ.महेश देशमुख यांनी महिलांच्या आरोग्याची तपासणी केली. यात महिलांनी महिलाच डॉक्टर असल्याने निसंकोचपणे समस्या सांगितल्यात, त्या जाणून घेत औषधोपचार आणि रुग्णालयात येवून काही तपासण्या करुन घेण्याचा सल्‍ला देण्यात आला. या शिबिराचा ७६ महिलांनी लाभ घेतला. या शिबिरासाठी रवि तायडे यांनी परिश्रम घेतले.

याशिवाय २४ मार्च रोजी कोरपावली, २५ मार्चला संग्रामपूर तालुक्यातील कवठळ, अमळनेर याठिकाणी मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content