शिक्षकांचें विविध प्रश्नांसंदर्भात आ.किशोर दराडे यांना साकडे

एरंडोल – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर येथे आमदार गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याप्रसंगी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे हे आले होते. राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत चर्चा केली आणि मागण्याचे निवेदन दिले.

यावेळी दिनांक 20 मार्च रोजी राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर दराडे यांची भेट घेतली यावेळी जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील सर जळगाव जिल्हा ज्युनियर कॉलेज संघटनेचे कार्याध्यक्ष शैलेश राणे सर, प्रा.अनिल परदेशी, प्राथमिक शिक्षक संघटनेचे सरचिटणीस दिलीप पाटील, ग.स.सोसायटीच्या माजी संचालिका सौ.कल्पना पाटील, किरण सुरळकर यासह असंख्य शिक्षकांची उपस्थिती होती.

याप्रसंगी शालार्थ आयडीचा प्रश्न हा खूप भीषण आहे आणि मार्च महिना अखेरचा आठवडा असल्यामुळे शिक्षकांच्या आशा मावळत चालल्या आहे. गेल्या आठ महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षक अतिशय तनावांमध्ये आहे. त्यामुळे तात्काळ शालार्थ आयडी देऊन शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा होणे आवश्यक आहे. त्याकरीता आपल्याकडून ठोस पावले उचलण्यात यावी, अशा प्रकारचे आमदार किशोर दराडे यांना सांगण्यात आले.

यावेळी आमदार किशोर दराडे यांनी एच एस सी बोर्डाचे अध्यक्ष नितीन उपासनी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केले असता दि.२५ मार्च २०२२ पर्यंत सर्व शालार्थ आयडी व ऑनलाइन शालार्थ ड्राफ्ट भरलेल्या शिक्षकांच्या खात्यावर वेतन अदा करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास दिला. त्यामुळे तूर्तास तरी शिक्षकांना दिलासा मिळाला असला तरी गेल्या आठ महिन्याचे वेतन दिनांक दि.२५ मार्च २०२२ रोजी जमा झाल्यास खऱ्या अर्थाने प्रश्न मार्गी निघेल, अशी आशा शिक्षकांना यामुळे निर्माण झाली आहे. यासह त्रुटी पूर्ततेची शाळांना अनुदान देणे, अघोषित शाळा घोषित करून शाळांना अनुदान देणे, जुन्या प्रचलीत सूत्रानुसार अनुदान मिळणे या विषयांवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. आमदार किशोर दराडे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ शिक्षक नेते संभाजी पाटील सर, जुक्टो कार्याध्यक्ष शैलेश राणे, अनिल परदेशी सर श्री महेश पाटील सर,अर्चना चव्हाण,असंख्य शिक्षक उपस्थित होते. संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड यांनीही दूरध्वनीवरून वरील समस्यांसंदर्भात निवेदन केले.

Protected Content