यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मारूळ येथे ग्रामस्थांना शासनाच्या वतीने भोगवटदार वर्ग दोन म्हणुन वाटप मोहिमेच्या माध्यमातून महाराजस्व अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. मारूळ या गावातील सुमारे ११९ भुखंडधारकांना भूखंडावर भेट माहीती देण्यासाठी फैजपुर विभागाचे मंडळ अधिकारी जे .डी. बंगाळे व तलाठी एस.टी. कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत भेट आयोजीत करण्यात आली होती . याप्रसंगी उपस्थित भूखंडधारक यांना कलम २९मधील सुधारणाबाबत समजुन सांगण्यात आली . सदरच्या या भोगवटा धारकांनी पुढील दोन वर्षात रक्कम भरल्यास त्यांना बाजार मुल्याच्या केवळ १५ % टक्के रक्कम द्यावी लागेल व त्यानंतर भरल्यास ६० % टक्के रक्कम वर्ग एक करण्यासाठी लागेल , याबाबत उपस्थित भूखंडधारकांना सविस्तर माहीती देवुन जाणीव करून देण्यात आली. यावल तालुक्यातील शासकीय जमीनीवर वर्षानुवर्ष अतिक्रमण करून राहणाऱ्या ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांनी अधिका अधिक या मोहिमेतुन मार्गदर्शन घेवुन शासनाचा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावल पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आ
मारूळ येथे महाराजस्व अभियानास प्रारंभ
4 years ago
No Comments