यावल येथे भारतीय जनता पक्षाची बैठक

यावल प्रतिनिधी । आज  भारतीय जनता पार्टी ची बैठक धनश्री चित्र मंदिरच्या सभागृहात पार पडली. 

बैठकीचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी केले. त्यांनी प्रस्ताविक भाषणात सांगितले की भारतीय जनता पार्टीची संघटन हे मजबूत आहेच व अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने एक दिलाने काम करावे. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या सर्वांचे आवडते लोकनेते कृषीमित्र स्व.माजी .आमदार हरिभाऊ जावळे गेल्याने तुम्ही काही पोरके झाले नाही. काही  अडचणी उद्भवल्यास मला अर्ध्या रात्री फोन करा. मी तुमच्या अडीअडचणी सोडण्यास कटिबद्ध आहे असे ते म्हणाले. तर श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले की भाजपाचा विस्तार करण्यासाठी सर्वांनी  अधिक जोमाने काम करून पक्षाला अधीक बळकट करावे. त्यासाठी वेळ प्रसंगी नवीन कार्यकर्ता सुद्धा जोडावे लागणार आहे व ते आपण जोडू तसेच मला पक्षाने दोन वेळा खासदार बनवले सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी खासदार झाले. डॉ . राजेंद्र फडके यांनी सांगितले की जनसंघा पासून भारतीय जनता पार्टी चे काम चालू आहे.स्वर्गीय उत्तम नाना पाटील कै.डॉ अशोक फडके ,चोपड्याचे माजी आमदार माधवराव पाटील असे अनेक पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आमदार-खासदार अशा विपरीत परिस्थितीमध्ये निवडून आल्याचे उदारण त्यांनी कार्यकार्यांना मार्गदर्शन करतांना सांगीतले. विजय पुराणीक यांनी बैठकीच्या समारोप भाषणात सांगितले की भारतीय जनता पार्टी कार्य व काम नाव मध्ये होऊन नका भारतीय जनता पार्टीचा लहानात लहान कार्यकर्ता आमदार , खासदार मंत्री व मोठा नेता होऊ शकतो हे भारतीय जनता पार्टीत शक्य होते. काही घटना घडल्यास पक्षकार्यकर्त्यांनी खचून न जाता पक्षाचे कार्य करावे त्यात कार्यकर्त्या मधून नेता तयार होतो असे विजय पुराणिक यांनी सांगितले व पदे व्यवस्थापनाचा भाग आहे ते बदलत असते पार्टीचे विचारधारा मधून कायम असते असे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. 

यांची होती उपस्थिती 

विजय पुराणिक यांनी सांगितले व पदे व्यवस्थापनाचा भाग आहे ते बदलत असते पार्टीचे विचारधारा मधून कायम असते असे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले,सदर बैठकी चे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन  विलास चौधरी यांनी केले. सदर बैठकीसाठी यावल तालुक्यातील मान्यवर व पदाधिकारी,कार्यकर्ते हजर होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, तसेच भाजपा खासदार श्रीमती रक्षाताई खडसे,प्रदेश चिटणीस,संघटणमंत्री विजय पुराणीक,उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर,सरचिटणीस विजय धांडे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा परिषदचे शिक्षण व क्रीडा सभापती रविंद्र पाटील, नंदकिशोर महाजन, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष ओ.बि.सी.सेलचे हर्षल पाटील, जिल्हा परिषद सदस्या सविता अतुल भालेराव, जिल्हा परिषद सदस्या नंदाताई सपकाळे, मा.भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, म.स.का. चेअरमन शरद महाजन, पंचायत समितीचे उपसभापती दिपक पाटील, राकेश फेगडे, प.स.सदस्या लक्ष्मीताई मोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती उमेश पाटील, डॉ. नरेंद्र कोल्हे, उज्जैन सिंग राजपूत, तालुकासरचिटणीस प.स.सदस्य योगेश भंगाळे, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, अनंत नेहते, मीनाताई तडवी, विद्या पाटील, कांचनताई फालक, नितीन राणे, सरला कवडीवाले, नागेश्वर साळवे, शशिकांत चौधरी, जाबीर खान, मनोज जावळे, सोहम कोळंब, उमेश बेंडाळे, हर्षल सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी पी.एस.सोनवणे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या बैठकीला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याने पत्रकारांनी आपली नाराजी पक्षाच्या पदाधिकारी यांच्या जवळ व्यक्त केली.

Protected Content