कॉम्रेड अमोल खरात यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | परभणीत असलेल्या एका जिंतूर गावातून उच्च शिक्षणासाठी औरंगाबाद मध्ये आलेला विद्यार्थी अमोल खरात सत्यशोधक कॉम्रेड पर्यंतचा प्रवास मुंबई मध्ये घेवून येतो मुंबई मध्ये एक महत्वाचं 861 संशोधक विद्यार्थ्यांचं आंदोलन उभ करतो ते आंदोलन सुरू असताना अमोल कल्याण मधील बुद्धभूमि फाऊंडेशनच्या संपर्कात येतो आणि सलग 40 दिवस त्या विहारात राहून मुंबईच्या आजाद मैदानावर आंदोलन करतो त्याच विहारात सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र, बुद्धभुमी फाऊंडेशन बुद्ध विहार समन्वय समिती यांच्या मार्फत काल दिनांक 21 सप्टेंबर रोजी सत्यशोधक कॉम्रेड अमोल खरात यांचा प्रथम स्मृती दिना निमित्त अभिवादन सभा घेण्यात आली.

प्रमुख उपस्थित सहकाऱ्यांना “सत्यशोधक कॉम्रेड अमोल खरात स्मृती ग्रंथ शिक्षणाचे समकालीन वास्तव आणि विद्यार्थी चळवळ” भेट देण्यात म्हणून आला. अभिवादन सभेला विहाराचे भंते प्रियदर्शी, बौद्धभुमी फाऊंडेशन चे ई. गौतम बस्ते आणि नवीन गायकवाड, सुनील, सविस माजी राज्य सचिव विकास मोरे, राज्य सदस्य विजय वाघ, दिपाली भालेराव आणि रितेश तांबे, सविस चे समीर तांबे तसेच लोकशाही विद्यार्थी संघटनेचे शंतनु, छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे स्वाती त्रिभुवन, काँग्रेस पार्टी मुंबई चे स्पीकर अमर जोशी, TISS मुंबई चे विद्यार्थी नागनाथ निकाळजे, संविधान सांस्कृतिक जलसाचे अशोक बनकर आणि इतर सदस्य उपस्थित होते.

सभेच्या सुरवातीला बुद्ध वंदना घेवून बाबा साहेबांना अभिवादन करणारे “वंदितो आता तुला” क्रांती गीत घेत “आठवा तो भगतसिंग कसा कसा लढला”, “दोस्ती जिंदाबाद साथी क्रांती जिंदाबाद” सारखी क्रांती गीत सादर केली गेलीत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाराष्ट्र राज्य सचिव तुषार सूर्यवंशी यांनी केले आणि अभिवादन सभेचा समारोप वामनदादा कर्डक यांचे “राहील विश्व सारे जाईन मी उद्याला” गीत घेवून करण्यात आले.

Protected Content