Home आरोग्य दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले फक्त २ कोरोना बाधित रुग्ण

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले फक्त २ कोरोना बाधित रुग्ण

0
33

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात फक्त २ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

आज दिवसभरात जळगाव शहरात ०१ आणि भुसावळ येथे ०१ असे फक्त २ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५०५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ८३२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९१ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आता सध्या ८२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे.


Protected Content

Play sound