सावदा प्रतिनिधी । सावदा ग्रामीण रुग्णालयाच्या श्री आ. गं. हायस्कुल येथील लसीकरण केंद्रास मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. तसेच समस्या जाणून घेऊन त्यांची पूर्तता उद्यापासून करावी, असे अधिकारी यांना सांगितले.
यावेळी यांचे सोबत शिवसेना उपतालुका प्रमुख लाला चौधरी, माजी नगरसेवक शाम पाटील, शहर प्रमुख भरत नेहते, मनीष भंगाळे, गणेश माळी उपस्थित होते. आज आमदार पाटील यांनी केंद्रात मुख्यधिकारी सौरभ जोशी यांचेशी लसीकरणास येणाऱ्या नागरिकांना बैठक व्यवस्थेसाठी १०० खुर्च्या व पिण्यासाठी पाण्याची सोय करावी, अशी सूचना केल्याने फिजिकल डिस्टन्ससिंग व लसीकरण करतांना गर्दी पण होणार नाही.
लसीकरण सुरू झालें तेव्हा पासून नागरिकांना कोव्हेक्सीन ही लस देण्यात आली आता याच नागरिकांना दुसरा डोस उपलब्ध होत नसल्याने त्याची मागणी नागरिकांची काल मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना दि ७ रोजी संध्याकाळी भ्रमणध्वनीद्वारे केली. तक्रारीची दखल घेत लगेच आज केंद्रास भेट दिली तेथूनच आमदार पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी बोलणे केले असता, त्यांनी येत्या सोमवार पर्यंत को व्हाक्सीन ही लस येथे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
सावदा येथे प्रथम “कोव्हेक्सीन” घेणाऱ्या नागरिकांना प्रथम डोस घेऊन जवळपास ४० ते ५० दिवस वर झाले. असून त्यांना आता कोव्हेक्सीन चा दुसरा डोस घेणे अनिवार्य झाले असताना सदर लस येथे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची चांगलीच वणवण होत असून अनेक दुसऱ्या ठिकाणी किंवा खाजगी रुग्णालयात देखील ती उपलब्ध होत नसल्याने आता या नागरिकांना चिंता वाढली होती जर दुसरा डोस वेळेत मिळाला नाही तर आता पुढे काय करावे ही देखील चिंता लागून होती , येथील ग्रामीण रुग्णालयात तपास केला असता वरून जी लस येईल ती आपण देतो आम्हाला कोणती लस हवी ती मागणी करता येत नाही आज पाटील यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलणे करून आता कोव्हेक्सीन च्या दुसऱ्या डोस साठी उपलब्ध करून दिली व आधीची असे दोघी कंपनीचे लसीकरण सावदा शहरात होणार आहे.या करिता वेगवेगळी खोली व टीम तयार करावी अशी सूचना आरोग्य अधिकारी यांना सांगितले.
दोघ लसीचे डोस उपलब्ध होणार असल्याने नागरिकांची चितेस पूर्णविराम मिळणार असून नागरिकांनी गर्दी न करता कोविड शासकीय नियमांचे पालन करावे , लायनीत लसीकरणा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.