सांगवी येथे आ. नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून विकासकामे

चाळीसगाव, प्रतिनिधी । आ. निलय नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील सांगवी येथील विकासकामांसाठी ७ लाख मंजूर झाल्याने स्मशानभूमीत प्युअर ब्लॉग व बैठक व्यवस्थेसाठी बाकडे बसवण्यात आले आहेत. याबाबत सरपंचासह ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

तालुक्यातील सांगवी येथील स्मशानभूमीत प्युअर ब्लॉग बसवण्यात यावेत यासाठी सरपंच महेंद्रसिंग राठोड यांनी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. दरम्यान सरपंच महेंद्रसिंग राठोड यांनी आ. निलय नाईक यांच्याकडे विकासकामांसाठी मागणी केली. त्यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर आ. निलय नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून नुकतीच ७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. मंजूर झालेल्या पैशातून सांगवी येथील स्मशानभूमीत प्युअर ब्लॉग बसवणे सुरू असून बैठक व्यवस्थेसाठी १९ बाकडे बसवण्यात आले आहेत. या कामासाठी विनीत राठोड यांचा अमूल्य सहकार्य लाभले. तर सांगवी ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश राठोड यांचाही सहकार्य वाखाणण्याजोगा आहे. आ. निलय नाईक यांनी केलेल्या मदतीबद्दल सांगवी ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्रसिंग राठोड यांनी ग्रामपंचायतीकडून आभार मानले आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.