भगवान नगर परिसरात आ. राजूमामा यांच्या प्रचार रॅलीचे जंगी स्वागत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहर मतदारसंघातील भगवान नगर भागात महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांचे रांगोळ्या व फुलांच्या पाकळ्यांनी माग सुशोभित करत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी राजूमामा यांचा महिला भगिनींनी औक्षण करून प्रत्येक घरात गळ्यात पुष्पहार टाकून सत्कार केला. यावेळी राजूमामांनी देखील त्यांचे आभार मानले.

भूषण कॉलनी येथील काशी विश्वेश्वर मंदिर येथे पूजा करून आ. राजूमामा भोळे यांनी सोमवारी सकाळी पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली. तिथून कोल्हे नगर, मुंदडा नगर, अंबिका हौसिंग सोसायटी भगवान नगर, शास्त्रीनगर, रामानंदनगर, विवेकानंद नगर मार्गे वाघ नगर परिसरात प्रचार रॅलीचा समारोप झाला. मार्गात महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर आशाताई कोल्हे, माजी नगराध्यक्ष सिंधुताई कोल्हे, वसंतराव कोल्हे यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन ज्येष्ठांचे आ. भोळे यांनी आशीर्वाद घेतले.

माजी महापौर ललित कोल्हे यांच्या घरी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिताताई माळी यांनी काढलेली “विश्वास जुना, राजूमामा पुन्हा” या शीर्षकाखालील रांगोळी रॅली दरम्यानची आकर्षण ठरली. रॅलीच्या शेवटी वाघ नगर परिसरात माजी नगरसेविका उषाताई संतोष पाटील यांच्या घरी भाजप,शिवसेना व महायुती पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीमध्ये भाजप महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी महापौर ललित कोल्हे, माजी नगरसेवक गायत्री राणे, उषाताई पाटील, मंडळ क्रमांक ६ चे अध्यक्ष बापू कुमावत, अजित राणे, राजेंद्र खैरनार, संतोष पाटील,जीवन अत्तरदे, पिंटू बारी, चंद्रकांत बेंडाळे, रवि बारी, ओंकार राणे, विनोद भामरे, प्रवीण पाटील, ज्योती निंभोरे, रेखाताई पाटील, नीता काबरा जयश्री पाटील, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख सरिताताई माळी कोल्हे, पियुष कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लता मोरे, विनोद देशमुख, जयश्री कदम, ममता तडवी, रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, मिलिंद अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, महानगर जिल्हाध्यक्ष कल्पेश मोरे, विकी बागुल, सिद्धांत मोरे, बाबा म्हसदे, केतन वाणी, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content