वरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षाची दयनीय अवस्था झाल्याची माहिती आ. संजय सावकारे यांना मिळाली. सावकारे यांनी तात्काळ स्व:खर्चातून शवविच्छेदन कक्षाची दुरुस्ती करुन देण्याची ग्वाही दिली, असून कामाला सुरूवात करण्यात आली आहे.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील सेव विच्छेदन कक्ष गेल्या अनेक वर्षापासून दैयनीय अवस्थेमधे होता भुसावळचे आमदार संजय सावकारे ग्रामीण रुग्णालय मध्ये दोन दिवसापूर्वी आले असता ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर क्षितीजा हेंडवे यांनी शेव विच्छेदन कक्षाची दयनीय अवस्था झालेली माहिती आमदार संजय सावकारे यांना दिली लागली संजय सावकार यांनी स्वखर्चातून सेव्ह विच्छेदन कक्ष दुरुस्त करून देण्याची वाही दिली व सेवा सदन कक्षाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे.