आ. बं. विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा पाचवा स्नेहमेळावा उत्साहात

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित आनंदीबाई बंकट विद्यालयातील सन १९८७ मधील १० वी बॅचेसचे विद्यार्थी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नुकतेच एकत्र आले होते. या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा हा महाबळेश्वर येथे दि. २७ व २८ जानेवारी २०१९ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या स्नेहमेळाव्यात अनेक माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. मुंबई पुणे नासिक औरंगाबाद चाळीसगाव  तर काही परदेशातून मित्रमंडळी आली होती. यावेळी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यात आला. शाळेचा हा अशा प्रकारे पाचवा स्नेहमेळावा उत्स्फूर्तपणे पार पडला. या स्नेहमेळाव्याचे आयोजन पुणे येथील सुधीर भडांगे,शिरीष बारपांडे, विजय पवार, अनिल येवले, बापू बडोगे ,जयंत नगरकर, अनिल सांगळे, यांनी केले होते.  यासाठी राजेंद्र मांडे ,पारस परदेशी, प्रवीण वाबळे, संतोष नागरे, द्यानेश्वर सुपलेकर,संजय छाजेड,लमिलिंद मोराणकार, प्रमोद निकुंभ, महेंद्र येवले दिनेश येवले गणेश आढाव या यांनी परिश्रम घेतले. या सर्व माजी विद्यार्थ्यांनी महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली असता, त्यात त्यांना बरेचशी माहिती मिळाली. तसेच पुस्तकांचे गाव भिलार या ठिकाणी देखील भेट दिली. तसेच सर्वांनी ऐतिहासिक प्रतापगडाला सर्वांनी भेट देऊन पाहणी केली.तर महाबळेश्वर येथेच स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलेले होते.

Add Comment

Protected Content