मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अयोध्येत रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त देशभरात भक्तिमय व चैतन्यदायी वातावरण निर्माण झालेले आहे. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा उद्या दि २२ जानेवारी रोजी होत असल्याने या सोहळ्याच्या पूर्व सकाळी म्हणजेच २१ जानेवारी रोजी पुत्रदा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आ. चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील संतांच्या चार प्रमुख धामापैकी एक मानाचे स्थान असलेले आदिशक्ती संत मुक्ताई साहेबांचे समाधी स्थळ (कोथळी) तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे स्वच्छ्ता अभियान राबविले. आईसाहेबांच्या मंदिराची झाडू व पाण्याने स्वच्छता केली.
यावेळी नगरपंचायत मुक्ताईनगरचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या सह नगरपालिकेची पूर्ण स्वच्छ्ता टीमचे कर्मचारी, घनकचरा संकलन ठेकेदार उपस्थित होते. तर शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, तालुका प्रमुख छोटू भोई, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर प्रमुख राजेंद्र हिवराळे, प्रशांत टोंगे, शहर संघटक वसंत भलभले, माजी नगरसेवक संतोष कोळी, मुकेशचंद्र वानखेडे, निलेश शिरसाट, संतोष मराठे, युनूस खान, आरिफ आझाद, नुर मोहम्मद खान, दिलीप चोपडे, ललित बाविस्कर, साहेबराव पाटील, अमरदीप पाटील, संतोष माळी, स्वीय सहायक प्रवीण चौधरी आदीसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच एकादशी वारीला आलेले भाविक भक्त, वारकरी उपस्थित होते. 22 रोजी राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मंदिरातील स्वच्छता मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन या आनंद सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.