मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेनेत उभी फूट पडल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून शिवसेचे ४१ आमदार व १२ खासदार यांना घेवून गुवाहटी गेले आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अस जर शिवसेनेचे बंडखोर आमदारांना वाटत असेल तर त्यांनी २४ तासाच्या आत बंडखोरांनी मुंबईत परत यावे, त्यावर मागणींचा विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यानंती त्यांनी मुबईतील अधिकृत निवासस्थान सोडले असून मातोश्रीवर परतले आहे. समेटच्या सर्व आशा जवळपास संपल्यानंतर शिवसेना आता थेट बंडखोर आमदारांशी चर्चा करत आहे.
शिंदे गटातील निम्मे आमदार घरी परतल्यावर हे सरकार वाचू शकेल असे एका शिवसेनेच्या नेत्याने सांगितले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रत्येक आमदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतून बाहेर निघावं असे जर शिवसेनेचे बंडखोर आमदारांना वाटत असेल तर तुम्ही २४ तासाच्या आत परत या, मगच तुमच्या मागण्यांवर विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.