भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, रिपाई (आठवले गट) रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांचा प्रचार दौरा आज (दि.11) साकरी येथे उत्साहात पार पडला.
आ. सावकारे यांच्यासोबत दौ-यावेळी जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे, भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील, माजी पंचायत समिती सभापती राजू चौधरी, साखळी सरपंच कांचन भोळे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, वंदना उन्हाळे, सुनील महाजन, नरेंद्र पाटील, नागो भारंबे, संजय चौधरी, जितु चोपडे, राजेंद्र भारंबे, सोपान नेहेते, छोटू, पालक माजी सदस्य महेंद्र पांडव व इतर गावकरी मंडळी व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.