दुचाकी अपघातात महाविद्यालयीन तरूण गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुळजी जेठा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात असलेल्या तरूणाच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ६ वारी आयएमआर कॉलेजसमोर मंगळवारी २ जुलै रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. जखमी तरूणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

अधिक माहिती अशी की, विशाल विनोद भोई (वय २०, रा. चंदूआण्णा नगर, जळगाव) असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे. विशाल भोई या विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्याने तो मंगळवार २ जुलै रोजी दुपारी २ वाजता दुचाकीने मूळजी जेठा महाविद्यालयात जात होता. आयएमआर महाविद्यालयाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून जात असतांना समोरून एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या अपघात विशाल भोई याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला स्थानिक नागरीकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content