महाविद्यालयीन तरूणीनीं शेतकऱ्यांना दाखवले कीटकनाशके हाताळणीचे प्रात्यक्षिक

साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रम 2023-24 अंतर्गत कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील विदयार्थींनी मिनाज शेख, चैताली कुऱ्हे, वैष्णवी पालवे व तनुजा पाटील यांनी साकेगाव मधील शेतकऱ्यांना कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशके हाताळणीचे प्रात्यक्षिक करून त्यांना वेगवेगळ्या किडींचा, रोगांचा व तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती दिली.

या‌ प्रात्यक्षिकाकरिता कृषि महाविदयालय, मुक्ताईनगरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील, ग्रामीण कृषी जागरुकता व कृषि औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन डॉ. अविनाश कोळगे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बाळासाहेब रोमाडे, कार्यक्रम अधिकारी डाँ. सागर बंड व वनस्पती संरक्षण विभागाचे विशेषज्ञ डॉ. गणेश देशमुख व डॉ. नामदेव धुर्वे व डॉ सागर बंड यांचे मार्गदर्शन लाभले.

या प्रात्यक्षिकाकरिता मनोज नेहेते, गिरीज नेहेते, धीरज पाटील, केतन पाटील, तुळसाबाई सपकाळे, धनाबाई सपकाळे, दिपाली आढाळे, योगिता कोळी व चैताली सोनवणे आदी उपस्थित होते. गावाचे सरपंच सागर सोनवाल यांनी या प्रात्यक्षिकाकरीता कृषिकन्यांना प्रोत्साहित केले.

Protected Content